विज्ञान-आश्रमाची कथा – लेखांक १
[पुणे जिल्ह्यातल्या पाबळ या गावामध्ये गेली तीस वर्षे विज्ञानाश्रम कार्यरत आहे. डॉ. श्रीनाथ कलबाग ह्यांनी भारतामधील एक नवीन शिक्षणप्रयोग येथे करून दाखवला. शिक्षणव्यवस्थेतून ग्रामीण विकास. आज विज्ञानाश्रमात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असणारे डॉ. योगेश कुलकर्णी यांच्याकडून आपण हा प्रयोग करण्यामागची विचारधारा जाणून घेऊ या. प्रयोग सुरू केल्यापासून आजपर्यंत त्यात कसकसा विकास होत गेला हे तपशिलात …